संगमनेर शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

संगमनेर शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली आणि तिरंगा चौक (मालदाड रस्ता) या दोन्ही ठिकाणांहून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून पोबारा केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील कुंभार गल्ली येथे वास्तव्यास असणारे कृष्णा सुभाष कर्पे यांची होंडा कंपनीची ड्रीम युगा दुचाकी (क्र.एमएच.17, बीयू.2094) ही रविवारी (ता.11) घरासमोर लावली होती. परंतु दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून पोबारा केला. कर्पे यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी कोठेच मिळून आली नाही. त्यानंतर पुन्हा गुरुवारी (ता.15) अज्ञात चोरट्याने शहरातीलच तिरंगा चौक (मालदाड रस्ता) येथील सचिन कचरू उगले यांचीही दुचाकी (क्र.एमएच.17, एएल.9177) चोरून पोबारा केला. याबबात कर्पे व उगले यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वीही शहरातून अनेक दुचाकी चोरी गेल्या आहेत. मात्र काहींचा शोध लागला तर काहींचा लागला नाही. त्यामुळे दुचाकीधारकांनी सावध राहण्याची गरज आहे.

Visits: 211 Today: 2 Total: 2057310

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *