अकोले तालुक्यात कोरोनाचा पंचविसावा बळी!

अकोले तालुक्यात कोरोनाचा पंचविसावा बळी!
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात आज (बुधवार ता.7) कोरोना विषाणूंनी सत्तरवर्षीय वृद्धाचा बळी घेतल्याने बळींचा आकडा पंचवीस झाला आहे. तर बाधितांचा आकडा सतराव्या शतकाच्या पार गेला आहे.


आज सकाळीच अकोले तालुकावासियांना कोरोना विषाणूंनी धक्का देत देवठाण येथील 70 वर्षीय वृध्दाचा बळी घेतला आहे. तर मंगळवारी मवेशी येथील 82 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला होता. लागोपाठ दोन दिवस दोघा वृद्धांचा मृत्यू झाल्याने अकोले तालुकावासियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही रोज नव्याने भरत पडत असल्याने सद्यस्थितीत बाधितांच्या संख्येने सतराव्या शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

Visits: 176 Today: 1 Total: 2060002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *