महाविकास आघाडी सरकार पडले तर नक्कीच आम्ही सरकार बनवू! केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंची विविध मुद्द्यांवर तुफान फटकेबाजी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकाही भाजप सोबतच लढवण्याचे संकेत देत पश्चिम बंगालमध्ये 36 टक्के मागासवर्गीय असून तेथेही भाजपमध्ये राहून लढणार असून दहा जागा भाजपकडे मागणार आहे, असे सांगत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून काही मुद्द्यांवरुन पडलेच तेव्हाच भाजप व आम्ही सरकार बनवू. अन्यथा आम्ही हे सरकार पाडणार नाही, असे सूतोवाचही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये पत्रकार परिषदेत सोमवारी (ता.28) व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला राज्यातील आरपीआयचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री रामदास आठवले यांना ईडी तपास यंत्रणेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशात ईडी ही स्वतंत्र यंत्रणा असून ईडीचे काम हे स्वतंत्र आहे. त्यांना जर कोणाचा आर्थिक किंवा संपत्तीबाबत कागदपत्रात घोळ किंवा संशय आला तर ईडी त्यांची तपास यंत्रणा सुरू करते. कोणालाही राजकीय शत्रू म्हणून किंवा विरोधक म्हणून टार्गेट केले जात नाही, असे स्पष्ट करत ते पुढे म्हणाले, देशामध्ये आर्थिक उत्पन्न, संपत्ती या संदर्भात अधिक संशय बळवला गेला तर ईडी चौकशी करत असते. ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे. भारत सरकारचा किंवा सत्ताधारी पक्षाचा या यंत्रणेला कोणताही आदेश किंवा दबाव नसतो, तिचे स्वतंत्र तपास यंत्रणेचे काम ती करते. सध्या इथे सत्ताधारी पक्ष मुद्दाम ईडीमार्फत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची तपासणी करत आहे असे आरोप लावले जातात ते चुकीचे आहे. सत्ताधारी पक्षाचा यासंदर्भात काही संबंध येत नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले.

याचवेळी पत्रकारांशी हसत-हसत बोलताना ते म्हणाले, माझ्याकडे ईडी येणार नाही. आली तरी मी गो कोरोना गो कोरोना! असे म्हणेल, मी बीडी पितच नाही तर ईडी येणार कुठून! असेही विनोदी वाक्यात त्यांनी उत्तर दिले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या काळात विकास कामे झाले नाहीत, मात्र गुंडागर्दी मोठी वाढली आहे. त्यामुळे येथे भाजपला 200 पेक्षा अधिक जागा नक्कीच मिळतील व येथेळी भाजपचे सरकार येणार असे ठामपणे सांगत तेथे राष्ट्रपती राजवट करण्याचा केंद्राचा कोणताही विचार नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील सरकारबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असून काही मुद्द्यांवरून त्यांच्यात वाद आहेत, अजितदादाांनी आमच्याकडे येऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ मागे घेतली होती. त्यामुळे जरी देवेंद्र फडणवीस ‘मी येईन, मी येईन’ म्हणत असले तरी अजितदादा आल्यानंतरच परत आमचे सरकार येईल. आम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाडणार नाही. मात्र हे सरकार स्वतःहून पडले तर आम्ही सरकार बनवू असे आठवले यांनी स्पष्ट सांगितले.

त्याचप्रमाणे सध्या शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घेतलेले आहेत. जमिनीचे हस्तांतरण करार होणार नाही, एमएसपी खतम होणार नाही, मंडीही चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Visits: 11 Today: 1 Total: 116489

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *