वंचितांसाठी आधार फाउंडेशनचे काम प्रेरणादायी ः तांगडकर सहविचार सभेत पत्रकार बांधवांचा केला सन्मान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षणातून विद्यार्थी घडला जावा, वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्षेत्रात ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांनी भरारी घ्यावी. दुर्गम आदिवासी तसेच वंचित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद मिळावी यासाठी संगमनेरमधील आधार फाउंडेशन तन्मयतेने काम करून शिक्षण क्षेत्रात आदर्शवत असे विद्यार्थी घडवत आहे. ही अत्यंत समाधानकारक व प्रेरणादायी बाब आहे, असे विचार आधार फाउंडेशनच्या सहविचार सभेत उद्योजक कार्तिक तांगडकर यांनी व्यक्त केले.

यानिमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, प्राचार्य मुकुंद डांगे, पी. आर. शिंदे, श्याम तिवारी आदिंनी केले. पत्रकार दिन साजरा करत सभेचे अध्यक्षस्थान उद्योजक कार्तिक तांगडकर यांनी स्वीकारले. त्यांच्याच हस्ते सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोरक्षनाथ मदने व श्याम तिवारी यांनी मनोगत व्यक्त करत आधारच्या सामाजिक कार्याचा गौरवोल्लेख केला.

या पत्रकार दिन समारंभासाठी नितीन ओझा, आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, भारत रेघाटे, शेखर पानसरे, सचिन जंत्रे, अंकुश बुब, अमोल मतकर, सुनील महाले, नीलिमा घाडगे, संजय अहिरे, मुक्त पत्रकार संदीप वाकचौरे, सतीश आहेर, धीरज ठाकूर, सुशांत पावसे आदी पत्रकार बांधवांसह आधारचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. महादेव अरगडे व सोमनाथ मदने यांनी केले. आधार सहविचार सभेचे निवेदन सुखदेव इल्हे, विठ्ठल कडूसकर यांनी केले. यावेळी आधार फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल अनिल कडलग व तानाजी आंधळे यांनी माहिती दिली. आधारच्या मदतीमुळे अनेक डॉक्टर, इंजिनिअर, आयटीआयधारक, व्यावसायिक घडत असून अनेक गरजू परिवार उभे राहत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते दीपक कर्पे, कलाशिक्षक देवीदास गोरे, माजी सैनिक लक्ष्मण ढोले, युवा उद्योजक विलास कांडेकर, रक्तमित्र त्र्यंबक शिंदे, योगशिक्षक कैलास कानवडे, रावसाहेब पावसे, मनोहर यादव, राजू पिंगळे, अ‍ॅड. संतोष दिघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी केले.

Visits: 147 Today: 1 Total: 1919426

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *