स्वदेश कला उत्सव कलागुणांना संधी देणारे व्यासपीठ ः देशमाने धांदरफळमध्ये मकर संक्रांतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना व युवतींना स्वदेश कला उत्सवातून नामी संधी देणारे व्यासपीठ निर्माण केले असल्याचे प्रतिपादन स्वदेश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने व उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील स्वदेश सेवाभावी संस्थेने राष्ट्रीय युवा दिन व मकर संक्रांतीनिमित्ताने आणि राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हीच तर फॅमिलीची गंमत आहे विनोदी नाटकाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. कडाक्याच्या थंडीतही नाट्य रसिकांनी आनंद घेतला. तसेच मकर संक्रांतीनिमित्त महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू, तीळगूळ व वाण वाटप, पारंपारिक वेशभूषा व उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वेशभूषा स्पर्धेत लहान गटातून यशस्विनी घाडगे प्रथम क्रमांक, अक्षदा कासार द्वितीय क्रमांक, त्रिषा सतीश डेरे तृतीय क्रमांक, श्रीराज देशमुख चतुर्थ क्रमांक तर ईश्वरी वाकचौरे हिने पाचवा क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. मोठ्या गटात शीला देशमुख प्रथम क्रमांक, कल्याणी वाकचौरे द्वितीय क्रमांक, सविता मंडलिक तृतीय क्रमांक, मंदा डेरे चतुर्थ क्रमांक तर रूपाली नाईकवाडी यांनी पाचवा क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धाकांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उखाणे स्पर्धेत उज्वला खताळ प्रथम क्रमांक, स्वाती शिंदे द्वितीय क्रमांक, चंद्रभागा जोंधळे तृतीय क्रमांक, सीमा वहाडणे चतुर्थ क्रमांक तर काजल गोर्डे यांनी पाचवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी भास्कर कवडे, सारिका परदेशी, सुनीता कोडे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमांत लिटिल चॅम्प्स विजेता सारंग भालकेच्या गायनाने आणि पवन टाक यांच्या नृत्याने वाहवा मिळविली. अशा बहुरंगी कार्यक्रमांनी उत्सव अधिक रंगतदार झाला. निवेदन दत्ता कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनाथ देशमाने यांनी केले.

Visits: 123 Today: 1 Total: 1114660

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *