बिग बॉस फेम सुरज चव्हाण आज संगमनेरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवार दि.५ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालय मैदानावर  जंगी कुस्त्या होणार असून या कुस्ती कार्यक्रमासाठी बिग बॉस फेम सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये ३ लाख ११ हजार रुपयांकरता पहिली लढत होणार असून मैदानाची जय्यत तयारी सुरू आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. कुस्त्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते.यावर्षी यशोधन कार्यालयाच्या मैदानावर रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत  जंगी कुस्त्या होणार असून पहिले बक्षीस ३ लाख  ११ हजार रुपये करता महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत होईल तर दुसरे बक्षीस २ लाख ५१ हजार रुपयांकरता बाळू अपराध (सांगली) व समीर शेख (सोलापूर )यांच्यात लढत होईल.
मोठ्या बक्षिसांच्या दहा लढती होणार असून यावेळी माजी मंत्री  बाळासाहेब थोरात, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके, माजी आ. डॉ.सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, अजय फटांगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा ते तीन या वेळेत भव्य मिरवणूक होणार असून सटाणा येथील प्रसिद्ध बँड स्वर सम्राटचा दणदणाट यावेळी होणार आहे. यावेळी झापुक झूपूक या चित्रपटाचा अभिनेता तथा बिग बॉस फेम सुरज चव्हाण हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या जंगी कुस्त्यांसाठी संगमनेर मधील सर्व नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Visits: 154 Today: 1 Total: 1848014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *