आशीर्वाद पतसंस्थेने केले सभासदांच्या पाल्यांसाठी वह्यांचे वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक जबाबदारी ओळखत येथील आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांच्या मुलांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड म्हणाले, संस्थेचा सर्वसामान्यासाठीचा विश्वास वाखाण्याजोगा आहे, तो कायम राहील यासाठी संस्थेने काम करावे असे ते म्हणाले. कामात सातत्य ठेवा, सभासदांच्या कामी या, असे सांगत त्यांनी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब ताजणे, व्हा. चेअरमन रूपाली संतोष मेहेर, सर्व संचालक तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी थोरात कारखान्याचे माजी संचालक अभिजीत ढोले, नूतन संचालक अंकुश ताजणे, माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग, गजेंद्र अभंग, सुभाष ताजणे, सुधाकर ताजणे, संतोष मेहेर, रामनाथ कुऱ्हे, संजय अभंग, बाबुलाल बुळकुंडे, रामदास पावबाके, संजय मेहेर, भारत ताजणे, श्याम अभंग, सुभाष पावबाके, कैलास घोडेकर, बंटी मंडलिक, भारत ढोले, दशरथ काफरे, राजू मेहेर, रामदास गुंजाळ, पुंजा सातपुते, गोपीनाथ हिरे, चंद्रकांत देशमुख, शिवाजी घोडेकर, कारभारी वडजे, कैलास कुऱ्हे, निर्मला अभंग, श्रुती ताजणे आदी उपस्थित होते. संस्थेचे संचालक अरुण ताजणे यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन बाळासाहेब ताजणे यांनी स्वागत करून संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीमध्ये जसे सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा मोलाचा वाटा आहे, तसेच आमचे मार्गदर्शक व विविध संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार संस्थेच्या व्हा. चेअरमन रूपाली संतोष मेहेर यांनी मानले. यावेळी संचालक अरुण ताजणे, अरुण हिरे, अरुण पुंड, रामनाथ अभंग, विलास मंडलिक, राजेश ढोले, सोमनाथ अभंग, सिताराम अभंग, धनंजय डाके, रवींद्र पावबाके, सुनील दाभाडे, बाळासाहेब दासरी, अर्चना चिपाडे, बाळासाहेब गडगे, क्रांती घोडेकर, मॅनेजर रामनाथ बाळसराफ उपस्थित होते.
Visits: 177 Today: 1 Total: 2124202

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *