जमीन खरेदीत ५० लाखांची फसवणूक; चौघांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
नगर तालुक्यातील शेंडी परिसरात जमीन खरेदी करून देतो असे सांगून एकाकडून ५० लाखांची रक्कम घेवून नंतर खरेदी देण्यास टाळाटाळ करत आर्थिक फसवणूक केल्याची घटना २२ नोव्हेंबर २०१६ ते २७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हसन अमीर राजे (रा. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हसन राजे यांची शेंडी येथील नसीर साहेबलाल शेख, नजीर साहेबलाल शेख, अबिदा अब्बास सय्यद, एकनाथ दगडू भगत यांच्याशी जमीन खरेदी व्यवहाराबाबत चर्चा झाली होती. या चौघांनी फिर्यादी यांना जमिनीची खरेदी करून देण्याबाबत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सुमारे ५० लाखांची रक्कम घेतली. नंतर जमिनीची खरेदी देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांना पैसेही परत दिले नाहीत. आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हसन राजे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 120 Today: 1 Total: 1850039
