संगमनेर तालुक्यातील धक्कादायक रुग्णवाढ आजही कायम! जिल्ह्यात उच्चांकी रुग्णसंख्या; खासगी प्रयोगशाळांच्या अहवालाबाबत साशंकता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीचा वेग दोन आकडड्यात विसावलेला असतांना संगमनेरसह काही मोजक्या तालुक्यातून दररोज समोर येणारी रुग्णसंख्या संशय निर्माण करणारी ठरु लागली आहे. एकीकडे सुमारे दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातील दैनंदिन सरासरी अवघी 23 रुग्ण प्रतिदिवसावर आलेली असतांना संगमनेर तालुक्यातून दररोज तब्बल सरासरी 137 रुग्ण समोर येत असल्याने या संशयाला एकाप्रकारे बळकटी मिळत आहे. आजही जिलह्यातील सर्वाधीक रुग्ण समोर येणार्‍या संगमनेर तालुक्यात 171 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 28 हजार 792 झाली आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही अकराशेच्या पार गेली असून त्यातील निम्मे रुग्णही उपचाराधीन नसल्याने अलिकडच्या काळात कोविड नावाचाच संशय निर्माण होवू लागला आहे.


मागील संपूर्ण महिन्यात जिल्ह्यात दररोज सरासरी 624 रुग्ण या गतीने 18 हजार 288 रुग्णांची भर पडली होती. जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर तालुक्याचा वाटा सरासरी 74 रुग्ण या वेगाने 2 हजार 301 रुग्णांचा होता. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वाधीक रुग्णवाढ होणार्‍या तालुक्यांमध्ये पारनेर पहिल्या तर संगमनेर दुसर्‍या स्थानावर होते. असे असतांनाही पारनेर तालुक्याची सरासरी तीन आकड्यांत गेली नव्हती. मात्र चालू महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पारनेर तालुक्याच्या सरासरीत अचानक मोठी घट होवून संगमनेर तालुक्याने सर्वाधीक सरासरीचे स्थान गाठले. आजच्या स्थितीत पारनेर तालुक्याचा सरासरी रुग्ण समोर येण्याचा वेग 91 असून संगमनेर तालुक्यातून मात्र तब्बल 137 रुग्ण दररोज समोर येत आहेत. त्यातही रोजच्या अहवालांचे अध्ययन केल्यास शासकीय प्रयोगशाळा आणि रॅपीड अँटीजेनच्या एकत्रित अहवालांपेक्षा खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त होणार्‍या अहवालातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याने खासगी अहवालांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अर्थात खासगी प्रयोगशाळांकडून अहवालांमध्ये गोंधळ होत असल्याबाबत कोणताही दाखला उपलब्ध नाही.


आजही शासकीय प्रयोगशाळेचे 27, खासगी प्रयोगशाळेचे तब्बल 93 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा प्रापत 51 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 171 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ग्रामीणभागातील 65 वाड्या व वस्त्या मिळून 149 तर शहरीभागातून 20 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालात हिवरगाव पावसा येथील 31 वर्षीय तरुणाचे नाव दुबार नोंदविले गेले असून पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील 45 वर्षीय इसमाचा अहवालही संगमनेरच्या यादीत नोंदविला गेा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज 169 रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालातून तालुक्याच्या पठारभागातील 18 गावे आणि वाड्यावस्त्यांमधून 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बोटा, आंबी दुमाला, बिरेवाडी व साकूर येथून चारपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत.


आज संगमनेर शहरातील तब्बल 20 जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले असून त्यात सुतार गल्लीतील 13 वर्षीय मुलगा, गणेशनगर येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला, 59 वर्षीय इसम, 31 वर्षीय तरुण व 29 वर्षीय महिला, ताजणे मळा येथील 27 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अभिनव नगरमधील 28 वर्षीय महिला, मोगलपूरा येथील 74 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 55 वर्षीय दोन, 45 व 32 वर्षीय महिला, 47 वर्षीय इसम, 34, 33, 30, 24 व 22 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. याशिवाय हिवरगाव पावसा येथील 31 वर्षीय तरुणाचा अहवाल दोनवेळा नोंदविला गेला असून पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील 45 वर्षीय इसमावर संगमनेरात उपचार सुरु असल्याने त्यांचा अहवाल तालुक्यात नोंदविला गेला आहे.


आज पठारभागातील 18 गावांमधून 41 रुग्ण समोर आले असून त्यात बोटा येथील 81 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 60 व 38 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलगा, आंबी दुमाला येथील 73 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 70 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा व सहा वर्षीय मुलगी, बिरेवाडीतील 48 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण, 19 वर्षीय तरुणी व बारा वर्षीय मुलगा, साकूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय इसम, 41, 22 व 18 वर्षीय तरुण व 38 वर्षीय महिला, नांदूर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, एलखोप येथील 43 वर्षीय इसम,


पिंपळगाव देपा येथील 48 वर्षीय इसम, मांडवे बु. येथील 40 वर्षीय दोघा तरुणांसह 38 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 90 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 32 वर्षीय तरुण, घारगाव येथील 73 व 70 वर्षीय महिला, रणखांब येथील 50 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी पठारावरील 34 वर्षीय तरुण, कोलेवाडीतील 50 वर्षीय महिला, हिरेवाडीतील 19 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 55 वर्षीय महिला, कौठे मलकापूर येथील 42 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला व बोरबन येथील 38 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे.


तालुक्यातील अन्यभागात चिकणी येथील 45 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 55 वर्षीय महिला, निमगाव येथील 35 वर्षीय तरुण, समनापूर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम व 41 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57, 55, 52, 26 व 23 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42, 35 वर्षीय दोघी व 30 वर्षीय महिला, 12 व 10 वर्षीय मुले, शेडगाव येथील 48 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, पिंपरणे येथील 57 वर्षीय इसमासह 47 वर्षीय महिला, 37 व 35 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, घुलेवाडीतील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, 35, 29, 28 व 22 वर्षीय तरुण,


हिवरगाव पावसा येथील 51 व 45 वर्षीय दोघा इसमांसह 46 व 26 वर्षीय महिला, 31 वर्षीय तरुण, नऊ वर्षीय मुलगा व दोन वर्षीय बालिका, चणेगाव येथील 41 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 69, 50, 29 व 23 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगा, जाखुरी येथील 26 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्द येथील 52, 33 व 25 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलगा, कर्‍हे येथील 47 वर्षीय इसम, मालदाड येथील 40 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला, निमज येथील 54 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, 25 वर्षीय महिला व चार वर्षीय मुलगा, राजापूर येथील 72 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 36 वर्षीय महिला, सायखिंडीतील 49 वर्षीय इसम, पेमगिरीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय महिला,


पळसखेडे येथील 31 वर्षीय महिला, पानोडीतील 43 व 36 वर्षीय महिला, नांदूरी दुमाला येथील 37 वर्षीय तरुण, खळी येथील 70 वर्षीय महिला, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 48 वर्षीय इसम, 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, चिखली येथील 83 वर्षीय वयोवृद्ध इसम, रायते येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 वर्षीय महिला, रायतेवाडीतील 18 व 17 वर्षीय तरुणी, सावरगाव तळ येथील 38 वर्षीय महिला, कनोलीतील 46 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 24 वर्षीय तरुण, मनोली येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नान्नज दुमाला येथील 32 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 48 वर्षीय इसम, निळवंडे येथील 36 वर्षीय तरुणासह 32 वर्षीय महिला,


कौठे कमहेश्‍वर येथील 49 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथील 51 वर्षीय इसम, चिंचपूर येथील 40 व 36 वर्षीय तरुणांसह 21 वर्षीय तरुणी, प्रतापपूर येथील 55, 49 व 48 वर्षीय इसमांसह 34 व 28 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगी, चिंचोली गुरव येथील 83 वर्षीय वयोवृद्ध इसम, शिबलापूर येथील 38 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 21 वर्षीय तरुण, पोखरी हवेलीतील 31 वर्षीय तरुण, काकडवाडीतील 19 वर्षीय तरुण व पारेगाव बु. येथील 36 वर्षीय तरुण अशा तालुक्यातील एकूण 169 जणांना कोविडची लागण झाली असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 28 हजार 792 झाली आहे. सध्या तालुक्यात साडे अकराशेहून अधिक रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

Visits: 705 Today: 3 Total: 1415611

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *