नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कोविडचा उद्रेक सुरुच असून आजही उच्चांकी रुग्ण समोर येण्याची शृंखला कायम आहे. गेल्या एक मार्चपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या तिप्पट गतीने वाढत असल्याने निरीक्षण समोर आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आज अकोले व संगमनेर येथे आढावा बैठका घेतल्या आहेत. आजही जिल्ह्यातील 1 हजार 617 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील 98 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आजच्या एकूण अहवालात संगमनेर तालुक्यातील केवळ चार जणांचे अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. उर्वरित सर्व अहवाल खाजगी प्रयोगशाळेकडून मिळाले आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख एक लाख एक हजार 654 वर तर संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या नऊ हजारांचा आकडा पार करीत 9 हजार 77 वर जाऊन पोहोचली आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत 586 सक्रिय संक्रमित रुग्ण आहेत.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमधील कोविडच्या संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, पारनेर, पाथर्डी व श्रीगोंदा या तालुक्यांमधील रुग्णवाढीने अचानक गती घेतल्याचेही दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. असे असतानाही अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक संक्रमण असलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले वारंवार बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत व आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अकोले व संगमनेर येथे कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.

आजही अपेक्षेप्रमाणे जिल्हा शासकीय प्रयोग शाळेपेक्षा खासगी प्रयोगशाळेकडून अधिकचे अहवाल प्राप्त झाले. आज शासकीय प्रयोगशाळेचे 458, खासगी प्रयोगशाळेचे 619 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा प्राप्त झालेले 540 अशा एकूण 1 हजार 617 अहवालांंद्वारे जिल्ह्यातील कोविड बाधितांमध्ये नव्याने भर पडली. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 491, राहाता 190, राहुरी 126, श्रीरामपूर 105, नगर ग्रामीण व संगमनेर प्रत्येकी 98, कर्जत 97, कोपरगाव 77, भिंगार लष्करी परिसर 61, पाथर्डी 52, नेवासा 51, श्रीगोंदा 45, अकोले 39, पारनेर 31, शेवगाव 27, जामखेड आठ, इतर जिल्ह्यातील 20 व इतर राज्यातील एक अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज संगमनेर तालुक्यातील 98 जणांचे अहवालही पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात चार रुग्ण अन्य तालुक्यातील आहेत. आजच्या एकूण अहवालांमध्ये अवघे चार अहवाल शासकीय तर उर्वरित सर्व 94 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील 43 तर ग्रामीण भागातील 51 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसातील शहराची रुग्णसंख्या 119 तर ग्रामीण भागाची 228 ने वाढली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील विद्यानगर परिसरातील 74 वर्षीय महिला, मेनरोड वरील 34 वर्षीय तरुण, पोफळे मळा परिसरातील 55 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी, अकोले नाका परिसरातील 30 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 49 वर्षीय इसमासह 39, 34 व 21 वर्षीय तरुण, चैतन्यनगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम, इंदिरानगर परिसरातील 68 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 37 वर्षीय तरुण, जोर्वे रोड परिसरातील 31 वर्षीय तरुण, गोविंदनगर परिसरातील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिवाजीनगर परिसरातील 59 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय तरुण, आणि 65 व 40 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुणी, घोडेकर मळ्यातील 34 वर्षीय तरुण, शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील 40 वर्षीय महिला,

कुंथूनाथ सोसायटीतील 51 वर्षीय इसम, अकोले बायपास रस्त्यावरील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नाशिक-पुणे रस्त्यावरील 33 वर्षीय तरुण, मदिना नगर मधील 24 वर्षीय तरुण, साईनाथ चौकातील 59 वर्षीय इसम, सावतामाळी नगर परिसरातील 38 वर्षीय तरुण, सह्याद्री महाविद्यालया जवळील 22 वर्षीय तरुण, कुंभारवाडा परिसरातील 31 वर्षीय महिला, भारत चौकातील 46 वर्षीय इसम, घरकुल सोसायटीतील 46 वर्षीय इसम, माळीवाडा परिसरातील 57 वर्षीय इसम, आणि केवळ संगमनेर असा उल्लेख केलेल्या 67 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकांसह 47 वर्षीय इसम, 31, 28, 26 व 22 वर्षीय तरुण आणि 54 वर्षीय महिला आदींचाही संगमनेर शहराच्या बाधित यादीमध्ये समावेश आहे.

तर ग्रामीण भागातील पोखरी हवेली येथील वीस वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 38 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 75 व 25 वर्षीय महिलांसह 32 व 26 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 35 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 55 वर्षीय इसम, चंदनापुरी येथील 60 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 44, 43 व 27 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 46 वर्षीय महिला, तळेगाव येथील 28 व 24 वर्षीय महिला, खांजापुर येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह एक वर्षीय बालिका, आश्वी खुर्द येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 65 व 30 वर्षीय महिला, माळेगाव येथील 30 वर्षीय तरुण, चिखली येथील 45 वर्षीय महिला, साकुर येथील 20 व 19 वर्षीय तरुण, रायते येथील 25 व 19 वर्षीय तरुण, चणेगाव येथील 45 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 32 व 30 वर्षीय तरुण,

गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटी येथील 43 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 56 वर्षीय इसम, विठ्ठल नगर परिसरातील 49 वर्षीय इसम, हिवरगाव पठार येथील 30 वर्षीय महिला, मालदाड येथील 36 वर्षीय महिला, खांडगाव येथील एकूण 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय महिला, कोकणेवाडी येथील 39 वर्षीय तरुण, दाढ बुद्रुक येथील 73 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 51 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 40 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 25 वर्षीय महिला, पिंपळे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, राजापूर येथील 73 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 58 वर्षीय इसम व 42 वर्षीय महिला आणि शिबलापुर येथील 33 वर्षीय तरुणी अशा तालुक्यातील एकूण 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. याशिवाय कोल्हार येथील 25 वर्षीय तरुण, लोणी येथील 45 वर्षीय इसम, साकुरी येथील 58 वर्षीय इसम आणि अहमदनगरच्या सारसनगर मधील 59 वर्षीय इसम आदींवरही संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत.

संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमण पुन्हा एकदा जोमात आले असून गेल्या चार दिवसात तब्बल 347 रुग्ण समोर आले आहेत. त्यात शहरातील 119 तर ग्रामीण भागातील 228 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या एकूण रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील 2 हजार 769 तर ग्रामीण भागातील 6 हजार 308 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 8 हजार 330 रुग्णांनी उपचार पूर्ण करून घर गाठले असून सद्यस्थितीत 586 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार अथवा त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या बारा महिन्यात तालुक्यातील 67 नागरिकांचा कोविडने बळी घेतला आहे. तालुक्यातील कोविड मृत्यूचा दर 0.75 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 92.73 टक्के इतका आहे.
Visits: 139 Today: 2 Total: 1100084
Post Views:
3,481