लोटस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योग दिन साजरा 

नायक वृत्तसेवा, संगमनेर
के. एम.बी.एस निघूते मेमोरियल फाऊंडेशन,संचलित लोटस इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर  कॉलेज   मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली,लोटस स्कूलचे संस्थापक डॉ. शांताराम निघूते  तसेच  संचालिका डॉ. निलिमा निघूते यांनी  विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समवेत योगासने केली. तज्ञ क्रिडा शिक्षक भूषण  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि विविध योग मुद्रांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी योगावर आधारित घोषवाक्ये आणि भाषणे देखील केली. डॉ. शांताराम निघूते यांनी  योगाचे आरोग्यासाठीचे महत्त्व स्पष्ट करत सर्वांना दररोज योग करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली आणि त्यांनी योगाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवण्याचा निर्धार केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्याध्यापक डॉ.प्रताप पलेई  तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
डॉ. निलिमा निघूते यांनी विद्यार्थ्यांना सहजयोग,कुंडलिनी शक्ती व ध्यान धारण्याचे महत्व समजावुन सांगितले व दररोज ध्यान केल्याने आत्मविश्वास तसेच जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण सकारात्मक होत असण्याचे सांगितले.
Visits: 71 Today: 2 Total: 1580645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *