मातुलठाण येथील वाळू उपशावर धडक कारवाई 1 कोटी 83 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
वाळूतस्करांनी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पात्र उजाड करण्याचा विडाच उचलेला दिसून येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातून वाहणार्‍या मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रात होत असलेल्या वाळू उपशावर सोमवारी (ता.29) तालुका पोलिसांनी छापा टाकत 1 कोटी 83 लाख 50 हजार रुपयांच्या मुद्देमालासह पाच वाळूतस्करांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे वाळूतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मातुलठाण शिवारातील गोदावरी नदीपात्रात पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता सुनीलकुमार चुरामन महतो (वय 24, रा.धोडा वस्ती, ता.बेरमो, जि.बोकारो, रा.झारखंड, हल्ली मनजीतसिंग धुप्पड रा.आनंदवली, नाशिक) मनजीतसिंग धुप्पड (रा आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (वय 24, रा.राजोहा, ता.बहरी, जि.सिधी, मध्य प्रदेश), युवराजसिंग केशरसिंग भंडारी (वय 40, रा.डीजी बागेसर, जि.डेहराडून), रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर) हे वाळू उपसा करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 पोकलेन, 1 बुलडोझर, 1 ट्रक, 1 मोबाईल, 4 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी 83 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्य एक आरोपी फरार असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसांत गु.नों.क्र. 65/2021 व 66/2021 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक अतुल बोरसे, सहा.फौजदार राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश औटी, गोरे, पो.ना.लोंढे, गोरे, रणवरे, पो. कॉ.काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे आदिंनी केली आहे.

Visits: 231 Today: 1 Total: 2059637

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *