वडगाव पान येथे मालवाहू ट्रक पेटला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील वडगा वपान येथे मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतल्याने त्यामधील लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले आहेत. ही घटना सोमवारी (ता.29) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रकवरील (क्रमांक आरजे.14, जीजे.3971) चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून लॅपटॉपसह आदी साहित्य घेवून गुडगावकडे (हरियाणा) जात होता. सोमवारी सकाळी वडगावपान फाट्यावर आला असता ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे चालकाने ट्रक तेथून काढून काही अंतरावर असलेल्या शेताजवळ नेला. काही क्षणातच आग वाढल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ट्रकमधील लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून गेले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे हे अद्याप समजू शकले नाही.

Visits: 202 Today: 1 Total: 1980669

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *