ढोलेवाडीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ढोलेवाडी परिसरात राहणार्‍या वैभव दत्तात्रय पाबळे या बावीसवर्षीय तरुणाने रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात फाशी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणाला तात्काळ उपचारांसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीुनसार शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात राहणार्‍या वैभव दत्तात्रय पाबळे या तरुणाने रविवारी (ता.13) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात फास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असून याबाबत पोलिसांकडे अद्यापही ठोस माहिती नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालावरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो.ना. एस.डी.बोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. या तरुणाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 203 Today: 1 Total: 1915432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *