सतेचीवाडी येथे तरुणाची आत्महत्या

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या सतेचीवाडी येथील एका सव्वीस वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार ता.14) सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे.

रमेश नामदेव काळे (वय 26) असे या तरूणाचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या सतेचीवाडी येथे मयत रमेश काळे हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहात होता. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, शिवारातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस पाटील भाऊसाहेब देवके यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्सटेबल दशरथ वायाळ हे करत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Visits: 84 Today: 1 Total: 1099684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *