दंडे ज्वेलर्सच्या शाखा महाराष्ट्रभर सुरू व्हाव्यात : मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दंडे ज्वेलर्सच्या नाशिक, सिन्नर शाखेनंतर आता संगमनेर मध्ये शाखा सुरू करण्यात आली. यानंतर पुणे, मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या शाखा सुरू व्हाव्यात अशा शुभेच्छा मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी दिल्या.

१९२७ पासूनची जवळपास १०० वर्षांची परंपरा असलेल्या नाशिक येथील दंडे गोल्ड अँड डायमंडसचे दालन आता संगमनेरकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या टॉप टेन मध्ये मोठ्या दिमाखात मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी राजेश मालपाणी बोलत होते. मालपाणी पुढे म्हणाले, संगमनेर तालुका समृद्ध तालुका आहे. या तालुक्यात बँका, पतसंस्थाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. दंडे ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वास संपादन करत तब्बल ९८ वर्षांची सेवा दिली आहे. अजून दोन वर्षांनी त्यांची सेंचुरी पूर्ण होणार आहे. दंडे ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दंडे ज्वेलर्सचे संचालक योगेश्वर दंडे, अनिल दंडे, मीना दंडे, सुप्रिया दंडे यांनी स्वागत केले. दंडे ज्वेलर्सची नाशिक, सिन्नर आणि आता संगमनेर अशी तिसरी शाखा दिमाखात सुरू झाली आहे. यावेळी दंडे ज्वेलर्सच्या शंभर वर्षाच्या अनेक ग्राहकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी दंडे दालनाचे संचालक योगेश्वर दंडे म्हणाले, संगमनेरकरांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दंडे ज्वेलर्स मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत दागिन्याच्या मजुरीवर पन्नास टक्के सूट असल्याचे सांगून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे दंडे ज्वेलर्सचे संचालक योगेश्वर दंडे, अनिल दंडे, मीना दंडे, सुप्रिया दंडे यांनी स्वागत केले.

Visits: 215 Today: 3 Total: 1109451
