पिंपळगाव देप्यामध्ये चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

नायक वृत्तसेवा, घारगाव
‘शेतात ट्रॅक्टर का घातला’ असे विचारले असता त्याचा राग अनावर झाल्याने चौघांनी दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.10) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पिंपळगाव देपा (ता.संगमनेर) गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथे घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खंडेरायवाडी येथे आदेश भाऊसाहेब चाचन हा तरुण गुरुवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये असताना, नीलेश अशोक तळेकर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आदेश याच्या शेतात घेवून आला आणि ढेकळं फोडू लागला. त्यावेळी आदेश हा त्यास म्हणाला की ‘तु आमच्या शेतात ट्रॅक्टर का घातला’ असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने आदेश यास शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे भारत रावसाहेब तळेकर, अशोक रावसाहेब तळेकर, राजेंद्र आबाजी ढेरंगे हे आले त्यांनीही आदेशला शिवीगाळ केली. भारत तळेकर याने त्याच्या हातातील दगड आदेशच्या पाठीत मारला. तसेच चाकूने आदेशच्या डाव्या दंडावर वझरता वार केला. यावेळी आदेशची आई जयाबाई चाचन या वाद सोडविण्यास आल्या असता त्यांना देखील भारत याने हातातील दगडाने जखमी केले आणि खाली ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर गळ्यातील मणीमंगळ सूत्र व डोरले तोडून घेतले. याचवेळी आदेशचा भाऊ शशीकांत चाचन हाही वाद सोडविण्यास आला असता त्यालाही वरील लोकांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तुम्हांला जीवे मारू’ अशी धमकी दिली. याप्रकरणी आदेश चाचन याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 131/2021 भादंवि कलम 326, 327, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहे.

Visits: 195 Today: 2 Total: 2163476

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *