वीजबिलाबाबत ‘मनसे’चा महावितरणला इशारा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकार विरोधी वाढीव वीजबिला संबंधी धडक मोहीम उघडली असून आज (गुरुवार ता.26) संविधान दिनी संबंध महाराष्ट्रभर जनआंदोलन पुकारले आहे. याचाच भाग म्हणून कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करुन वाढीव बिलाबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा भविष्यातील परिणामास तयार रहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, अलीम शहा, बापू काकडे, रघुनाथ मोहिते, संजय जाधव, संजय चव्हाण, बंटी सपकाळ, नितीन त्रिभुवन, जावेद शेख, आनंद परदेशी, सचिन खैरे, सागर महापुरे, संजय जाधव, नवनाथ मोहिते आदी मनसैनिकांनी कोपरगाव वीज मंडळाला निवेदन देत इशारा दिला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही प्रकारे वीज बिलाला माफी मिळणार नसून डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांनी वीजबिल भरण्यास सांगितले आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करुन लवकरात लवकर वीज बिलासंबंधी ठोस निर्णय घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे. अन्यथा होणार्‍या परिणामास तयार राण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

Visits: 169 Today: 1 Total: 1913303

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *