तालुकास्तरीय समन्वय समितीच्या सदस्यपदी वाकचौरे

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या सदस्यपदी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब वाकचौरे यांची निवड झाली आहे.

सदर समितीच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. किरण लहामटे तर तहसीलदार सतीष थेटे सचिव असून, सदस्यपदी वीरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ज्येष्ठ नेते बाबासाहेब वाकचौरे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. याचबरोबर या समितीत इतर एक सदस्य व सात अशासकीय सदस्यांची देखील निवड झाली आहे. दरम्यान, वाकचौरे यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, नानापाटील वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुमकर, अंकुश थोरात, ज्ञानेश्वर खुळे, ज्ञानेश्वर वाकचौरे, सुभाष कुमकर आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 292 Today: 2 Total: 2164893

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *