नेवासा येथे महसूल कर्मचार्यांचा संप
नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील महसूल कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार ता.26) संविधान दिनी ठिय्या मांडून एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग घेतला आहे.
कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या अहवालानुसार राज्यातील कर्मचारी 26 नोव्हेंबर रोजी लाक्षणिक संप आंदोलन करत असल्याने त्यास पाठिंबा म्हणून नेवासा येथील महसूल कर्मचार्यांनी लाक्षणिक संप नेवासा तहसील कार्यालयासमोर बसून केला आहे. जुनी पेन्शन योजना, खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरणे रद्द करणे, अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करणे, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करणे, नवीन कामगार कायदे रद्द करणे, केंद्रीय कर्मचार्यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचार्यांना मंजूर करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या संपामध्ये महसूल कर्मचारी राजेंद्र वाघ, उत्तम रासकर, डी. डी. रक्ताटे, विजय धोत्रे, मिलिंद नवगिरे, तुकाराम तांबे, आनंदसिंग गुसिंगे, ओ. आर. खुपसे, एम. ए. डोळस, पी. जी. नन्नवरे, एस. बी. क्षेत्रे, व्ही. पी. नायमाने, सुदर्शन दुर्योधन, एम. डी. गांगुर्डे, आर. जी. वाघमारे, श्रीमती मोडसे, सुशीला खोमणे सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.