अंबड येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अंबड येथील मुक्ताईवाडी परिसरात भक्ष्याच्या शोधात असणार्‍या बिबट्याचा अंदाज चुकल्याने विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

अंबड येथील गवराम वाळीबा जाधव हे सकाळी विहिरीवरील विद्युतपंप चालू करण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीतील पाण्यावर बिबट्या तरंगताना दिसला. त्यांनी लगेच सरपंच दत्तात्रय जाधव यांना सांगितले. त्यांनी वन विभागाला कळविले असता वनपाल व्ही. एन. पारधी, वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांची मदत घेत मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. यावेळी पंचनामा करण्यात आला. दुपारी या मृत बिबट्याला सुगाव बु. येथील रोपवाटिकेत नेऊन पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भांगरे यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या मादी असून दोन ते अडीच वर्षे वयाचा असल्याचा समजते.

 

Visits: 95 Today: 1 Total: 1101063

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *