साकूर येथे अज्ञाताने वृद्धाचे वीस हजार चोरले

साकूर येथे अज्ञाताने वृद्धाचे वीस हजार चोरले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या शाखेमधून सखाहरी विष्णू दुशिंग (रा.जांबुत खुर्द) या वयोवृद्धाने वीस हजार रूपये काढून खिशात ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून आल्हादपणे हे वीस हजार रुपये चोरून पोबारा केला असल्याची घटना बुधवारी (ता.11) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सखाहरी दुशिंग हे वयोवृद्ध शेतकरी बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास साकूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. दरम्यान, खात्यामधून वीस हजार रुपये काढल्यानंतर ते पैसे त्यांनी खिशात ठेवले आणि पासबुक छापण्यासाठी ते गेले. याच संधीचा फायदा उठवत पासबुक छापत असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवून आल्हादपणे त्यांच्या खिशात हात घालून वीस हजार रूपये चोरून पोबारा केला. याप्रकरणी सखाहरी दुशिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 415/2020 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल दशरथ वायाळ हे करत आहे.

 

Visits: 167 Today: 1 Total: 2056440

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *