मुर्तिकारांचा गणपतींच्या मूर्तींवर अखेरचा हात यंदा बाप्पाच्या मूर्ती २५ टक्क्यांनी महागणार


नायक वृत्तसेवा, राजुर
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात, त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अकोले तालुक्यातील राजुर येथील मूर्तिकार विलास भालेराव गणेशोत्सवाकरिता लागणार्‍या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत असून अधिक मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत.


यंदा पंधरा दिवस अगोदरच गणपती आल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. मोठ्या मुर्तीना मागणी वाढली, त्यातच कच्च्या मालाच्या किंमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याने यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती महाग होण्याची होण्याची शक्यता आहे.
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तीची देखील रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. राजुरचे प्रसिद्ध मूर्तिकार भालेराव बंधू यांनी सांगितले की, मोठ्या मूर्तीना मागणी वाढली. त्यातच कच्च्या माल दरात वाढ झाल्याने यंदा किंमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता अपेक्षित आहे. कारागिरांच्या मानधनात वाढ तसेच रंग, काथ्या, दाग- दागिन्यांची सजावट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस या साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने विक्रीत वाढ निश्चित होणारच. मूर्तीची साफसफाई करण्यासाठी घरातील महिला काम करतात. आखणी व रेखनी करण्यासाठी वर्षभर काम करत असून शेवटचा हात मारण्याचे काम भालेराव बंधू करत आहेत.

Visits: 215 Today: 1 Total: 2061083

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *