साकुर परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा 

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील पठार भागात यंदाही पोळ्याचा उत्साह सर्वत्र जाणवला.यंदाच्या वर्षी देखील पठारावरील साकूर, चितळकर वस्ती, गाडेकर मळा, पेंडभाजे वस्ती, खेमनर वस्ती, आदी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला एकत्र करून मिरवणूक काढली. यावेळी बैलांना निरनिराळे गोंडे, पायाला घुंगराचा पट्टा, पाठीवर रंगीबेरंगी झुल, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांच्या माळांनी सजवले होते.तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरासह गुलालाची उधळण करीत बिरोबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी  सनई सुरांच्या आवाज अन् पारंपरिक वाद्यांवर लेझीम नृत्य सादर केले. मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला गुडघ्यावर बसून बिरोबा रायाचे दर्शन दिलं. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर,बजरंग दलाचे संतोष खेमनर, बाजीराव खेमनर, रोहन पेंडभाजे, गाडा मालक गणेश तोंडे, सुरेश चितळकर, बाबाजी चितळकर, सुभाष शेंडगे आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या सर्जा राजासह उपस्थित होते.
Visits: 479 Today: 1 Total: 1869338

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *