कृषीदूत ओंकार फटांगरेचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सुरु असलेल्या ‘ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव सन 2021-22’ कार्यक्रमांतर्गत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीदूत ओंकार दिगंबर फटांगरे याने निमज (ता.संगमनेर) गावची निवड केली आहे. या माध्यमातून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत शेतीविषयी मार्गदर्शन करत आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमांतर्गत ग्रामीण कृषी प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी ओंकार फटांगरे याने निमज गावची निवड केली आहे. या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील माती परीक्षण, बीज प्रक्रिया, फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे संगोपन आदी विषयांवर संवाद साधला जाणार आहे. तसेच कृषी निगडीत विविध विषयांची प्रात्यक्षिक आयोजित करून आधुनिक तंत्रांविषयी माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमास कृषीदूताला शेतकर्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी त्यास सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलग, डॉ. अरविंद हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा काळे व सर्व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Visits: 199 Today: 1 Total: 2060678

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *