जिल्ह्यातील 522 रुग्ण आज उपचारांती घरी परतले

जिल्ह्यातील 522 रुग्ण आज उपचारांती घरी परतले
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यात आज (बुधवार ता.19) कोरोना आजारातून बरे झालेल्या 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता 11 हजार 647 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 81.19 टक्के इतकी आहे.


दरम्यान, मंगळवारी (ता.18) सायंकाळी सहा वाजलेपासून आज (बुधवार ता.19) दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 78 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 517 इतकी झाली आहे. बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 51, पाथर्डी 03, नगर ग्रामीण 11, कॅन्टोन्मेंट 04, नेवासा 01, पारनेर 2 आणि मिलिटरी हॉस्पिटल 06 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 159, संगमनेर 38, राहाता 26, पाथर्डी 29, नगर ग्रामीण 48, श्रीरामपूर 14, कॅन्टोन्मेंट 8, नेवासा 25, श्रीगोंदा 15, पारनेर 27, अकोले 7, राहुरी 14, शेवगाव 35, कोपरगाव 15, जामखेड 26, कर्जत 35, मिलिटरी हॉस्पिटल 1 असा समावेश आहे.

Visits: 144 Today: 1 Total: 1981792

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *