बेलापूर ग्रामपंचायतीत पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक खडाजंगी

बेलापूर ग्रामपंचायतीत पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक खडाजंगी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत गुरूवारी (ता.3) जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्याचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले.


याबाबतचे अधिक वृत्त असे की, सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना शरद नवले तेथे आले. आता ग्रामपंचायतीत प्रशासक आले आहेत, तुम्ही येथे काय करता? असा सवाल त्यांनी केला. त्यावरुन बाचाबाची व नंतर मारामारी झाली. श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे दत्तात्रय उजे, बेलापूर पोलीस ठाण्याचे साईनाथ राशिनकर, रामेश्वर ढोकणे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरीश पानसंबळ यांनी हस्तक्षेप करुन वादावर पडदा टाकला. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, यांनी घटनास्थळी भेट दिली. शरद नवले, सुधीर नवले, अनिल नवले, नितीन नवले यांच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Visits: 157 Today: 1 Total: 2057581

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *