पत्रकार रायकर मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

पत्रकार रायकर मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
नेवासा तालुका एकता पत्रकार संघाची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
पुणे येथील टीव्ही 9 चे वरीष्ठ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या व प्रशासनातील हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच रायकर कुटुंबियांना त्वरीत शासकीय मदत करण्याची मागणी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्यावतीने तसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.


स्व.रायकर यांना वैद्यकीय सेवा व सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचे दुर्देवी निधन झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायकर यांची प्रकृती खालावत असताना त्यांना वेळेत सेवा व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्देवी अंत झाला. याला कारणीभूत असणार्‍या प्रशासनातील अधिकारी तसेच हलगर्जीपणा करणार्‍या पुणे, कोपरगाव येथील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली.


या निवेदनावर नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर, सुनील गर्जे, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, आदिनाथ म्हस्के, अशोक तुवर, रमेश शिंदे, शंकर नाबदे, पवन गरुड, केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, उमाकांत भोगे, संतोष टेमक आदिंच्या सह्या आहेत.


अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र ग्रामीण भागातील पत्रकार पांडुरंग रायकर यांनी जिल्ह्याची ओळख राज्यामध्ये चांगल्या कामामुळे करुन दिली. अगोदर वृत्तपत्र क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाने पुढे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगल्या कामाने अनेक प्रश्नांना न्याय दिला. त्यांच्यावर अशी वेळ यावी हे मोठं दुर्दैव आहे. कोपरगाव, पुणे येथील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कुटुंबाला पन्नास लाखांची मदत करावी.
– बाळासाहेब नवगिरे (जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना)

Visits: 50 Today: 1 Total: 437562

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *