जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सेवेकरांचा गौरव

जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सेवेकरांचा गौरव
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा शहर व परिसरात गणेशोत्सव काळात अविरत सेवा देणार्‍यांचा मारुती चौकातील जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने नुकताच शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.


गणेशोत्सव काळात अविरत सेवा दिल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाचे जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने आभार मानून सत्काराद्वारे सर्वांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना आरतीचा मान दिला. प्रशासनाने दिलेल्या सेवेबद्दल पोलीस व नगरपंचायत यांचा जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने नगरसेवक राजेंद्र मापारी, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, युवा कार्यकर्ते ओंकार जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे स्वप्नील मापारी, सोमेश मापारी, अक्षय परदेशी, रोहित डोमकावळे, अक्षय दाणे, शुभम सरकाळे, अक्षय गवळी, समीर मापारी, अनिकेत मापारी, श्रावण रेणिवाळ, रोहन मुथ्था, आशिष मापारी, गणेश चौधरी, दीपक कुटे, तुषार परदेशी, तन्मय बिश्वास आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी मंडळाचे स्वप्नील मापारी यांनी आभार मानले.

Visits: 96 Today: 1 Total: 1110384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *