डोंगरगावमध्ये तरुण शेतकरी मारहाणीत जखमी

डोंगरगावमध्ये तरुण शेतकरी मारहाणीत जखमी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतपंपाची मोटार चालू करण्याच्या कारणातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एक तरुण शेतकरी जखमी झाला आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, डोंगरगाव येथे विकास दशरथ चिकणे (वय 24) हा त्यांच्या शेतात गट क्रमांक 98 व 5 मधील शेतीपंपाची विद्युत मोटार चालू करीत असताना अलंकार रमेश चिकणे, सिद्धार्थ रमेश चिकणे व रमेश कचरु चिकणे हे तेथे आले. त्यांनी मोटार चालू केल्याच्या कारणाहून विकास चिकणेच्या पाठीवर व डाव्या हातावर काठीरे बेदम मारहाण केली. दरम्यान, विकास चिकणे याचे वडील दशरथ चिकणे व भाऊ विशाल चिकणे हे वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जखमी विकास चिकणे याने दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Visits: 180 Today: 1 Total: 2071351

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *