गुरुकल मंडळाच्या अध्यक्षपदी कहाणे

गुरुकल मंडळाच्या अध्यक्षपदी कहाणे
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथील व अकलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ दिनकर कहाणे यांची संगमनेर तालुका गुरुकुल मंडळाच्या अध्यक्षपदी, कार्याध्यक्षपदी संजय नवले तर श्रीकांत बिडवे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.


कहाणे सध्या आंबी-माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी त्यांनी जिल्हा सरचिटणीसपदही भूषवले असून सध्या ते गुरुकुल जिल्हा उच्चाधिकार समितीच्या सदस्यपदी कार्यरत आहे. त्याचबरोबर पठारभागातील शिक्षकांचे नेते म्हणूनही कहाणे यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नूतन कार्यकारिणीत कोषाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष महेंद्र रहाणे, प्रवीण जठार, युवराज भाईक, अनिल गाडेकर, लहानू निळे, सादिक मणियार, कार्यकारी चिटणीस पंढरीनाथ थोरात, सहचिटणीस रामनाथ तांडकर, ऑडिटर शबनूर पटेल, प्रसिद्धी प्रमुख रामनाथ ठोंगिरे, संपर्क प्रमुख अनिल गोफणे, जिल्हा प्रतिनिधी भाऊसाहेब शेळके आदिंची निवड करण्यात आली आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 2059433

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *