संगमनेर तालुक्यात आजही आढळले उच्चांकी रुग्ण! शहरातील चोवीस जणांसह तालुक्यातील सत्तावन्न जणांना कोविडचे संक्रमण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच असून आजही 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील 24 तर ग्रामीण भागातील 33 जणांचा समावेश आहे. दोन रुग्ण अन्य ठिकाणचे आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने या महिन्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमधील कोविडच्या उच्चांकी रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 8 हजार 233 वर जावून पोहोचली आहे. त्यातील 626 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काही रुग्ण अलगीकरणात दाखल आहेत. आज तालुक्यातील 68 रुग्णांना उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या 1 मार्चपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने पुन्हा गती धारण केली आहे. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रासह उत्तर नगर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अहमदनगर शहर, राहाता व संगमनेर तालुक्याची कोविड स्थिती बिकट बनली आहे. आजही जिल्ह्यातील 654 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात 225, संगमनेर 59, श्रीरामपूर 55, कोपरगाव 53, राहाता 50, पारनेर 38, नगर ग्रामीण 33, शेवगाव 21, जामखेड व अकोले प्रत्येकी 18, पाथर्डी व कर्जत प्रत्येकी 17, राहुरी 15, नेवासा 14, इतर जिल्ह्यातील 13, लष्करी क्षेत्रातील 6 व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

आज जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून 4, खासगी प्रयोगशाळेकडून 47 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 8 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील अभिनवनगर परिसरातील 59 व 33 वर्षीय महिलेसह 35, 34 व 16 वर्षी तरुण, चव्हाणपुरा येथील 62 वर्षीय महिला, जनतानगर येथील 41 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, शिवाजीनगर येथील 25 वर्षीय तरुण, सह्याद्री कॉलेजजवळील 37 वर्षीय तरुण, राजस्थान चित्र मंदिराजवळील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवीगल्ली परिसरातील 31 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 80, 70 व 39 वर्षीय महिला, रंगार गल्लीतील 63 वर्षीय महिला, चैतन्यनगर परिसरातील 31 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा उल्लेख केलेल्या 52, 38 व 20 वर्षीय महिलांसह 55 वर्षीय इसम आणि 35, 18 व 17 वर्षीय तरुण अशा एकूण 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील अकलापूर येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 49 वर्षीय महिला, शेळकेवाडी परिसरातील 85 वर्षीय वयोवृद्धासह 78 व 31 वर्षीय महिला आणि 10 व 6 वर्षांची मुले, घुलेवाडी येथील 65 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम आणि 15 व 9 वर्षीय मुली, गुंजाळवाडी येथील 21 वर्षीय तरुण, गोल्डनसिटी परिसरातील 36 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय तरुण व 3 वर्षीय बालिका, श्रीरामनगर परिसरातील 41 वर्षीय तरुण, आश्वी येथील 3 वर्षीय बालिका, चिखली येथील 56 वर्षीय इसमासह 21 वर्षीय महिला, साकूर येथील 27 वर्षीय तरुण, मालदाड येथील 31 वर्षीय तरुण, पारेगाव बु. येथील 38 वर्षीय तरुण,

वडगाव पान येथील 50 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 74 वर्षीय महिला, खांडगाव येथील 30 वर्षीय महिला, निमज येथील 37 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 42 वर्षीय महिला, शेडगाव येथील 70 व 65 वर्षीय महिला, कोठे खुर्द येथील 24 वर्षीय तरुण, नांदूर येथील 25 वर्षीय तरुण अशा ग्रामीण भागातील 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सोबतच गुंडेगाव येथील 40 वर्षीय तरुण व उंब्रज येथील 45 वर्षीय इसम या बाह्य जिल्ह्यातील दोघांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज 59 रुग्णांची भर पडल्याने तालुका आता 8 हजार 233 वर पोहोचला आहे. त्यातील 626 रुग्ण सक्रीय संक्रमित असून 68 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.

