पुणतांब्यामध्ये भाजीविक्रेत्या महिला बालंबाल बचावल्या…

पुणतांब्यामध्ये भाजीविक्रेत्या महिला बालंबाल बचावल्या…
नायक वृत्तसेवा, राहाता
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील पुणतांबा येथे बघावयास मिळाला. भाजी विक्रेत्या दोन महिला झाडाची फांदी अंगावर पडण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना शुक्रवारी (ता.28) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणतांबा येथे जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा फुले भाजीमंडई सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास जोराचा वारा सुटल्यामुळे भाजीमंडईच्या पश्चिमेस असलेल्या एका हॉटेलजवळील सुबाभळीच्या झाडाची फांदी तुटली. मात्र तुटताना तिचा मोठा आवाज झाल्याने झाडाखाली ज्यांनी दुकान थाटले होते; त्यांनी जिवाच्या आकांताने पळ काढला. परंतु तुटलेली फांदी दुकानावर न पडता वीजेच्या खांबावर अडकली. यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यामुळे दोन्ही भाजी व्रिकेत्या महिलाही बालंबाल बचावल्या.

Visits: 296 Today: 1 Total: 2062159

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *