भारनियमन विरोधात संगमनेरात भाजपचे आंदोलन राज्य सरकारच्या नियोजनाअभावी भारनियमनाचे संकट ओढावल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महावितरणच्या भारनियमन विरोधात संगमनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने बसस्थानकासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कंदील (मेणबत्ती) आंदोलन करण्यात आले.

देशात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना आणि रेल्वे मंत्रालय आवश्यक तेवढ्या वॅगन उपलब्ध करून देत असताना राज्य सरकारच्या नियोजनाअभावी राज्यावर आज भारनियमनाचे संकट ओढावले आहे. वीजबिलाची वसुली काटेकोरपणे सुरू असताना ग्राहकांकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यास महावितरण सक्षम नाही आहे. 2014 ते 2019 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना राज्यात पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करून भारनियमनमुक्त महाराष्ट्र केला असताना महाविकास आघाडी सरकारने आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अंधारात लोटून भारनियमन चालू केले आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आम्ही महाविकास आघाडी सरकारचा आणि ऊर्जामंत्री राऊत यांचा जाहीर निषेध करतो असे यावेळी बोलताना शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले म्हणाले.

या आंदोलनात शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, माजी शहराध्यक्ष सीताराम मोहरीकर, भाजप ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, भाजप ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, भाजप शहर सरचिटणीस भगवान गिते, किशोर गुप्ता, शहर भाजपचे उपाध्यक्ष सुनील खरे, कैलास भरीतकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर, शहर सचिव मनोज जुंदरे, अमित गुप्ता, कार्यालयीन प्रमुख संतोष पठाडे यांसह सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 16 Today: 1 Total: 115856

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *