डोंगर आखेगावमध्ये घरफोडी करुन दीड लाखांचा ऐवज चोरला

नायक वृत्तसेवा, शेवगाव
घरातील सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचा मागील दरवाजा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 64 हजारांचा ऐवज पळविल्याची घटना शनिवारी (ता.19) सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील डोंगर आखेगाव येथे घडली आहे.

एकनाथ भानुदास डोंगरे (रा.डोंगर आखेगाव, ता.शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शनिवारी (ता.19) घरातील व शेजारील सर्वजण गेवराई (ता.नेवासा) येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटाची उचकापाचक केली. 1 लाख 29 हजारांचे नेकलेस, झुंबर व वेल तसेच 35 हजारांची रोख रक्कम असा 1 लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, रविवारी (ता.20) उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यानुसार तपासाची चक्रे फिरविली आहेत.

Visits: 185 Today: 1 Total: 2058678

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *