सफायर बिजनेस एक्स्पोला नागरिकांचा उदंड प्रतिसाद 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना खरेदी, मनोरंजनासह मेजवानीची संधी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नवनवीन उद्योगांची, वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील 15 वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरच्यावतीने सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते. 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या एक्स्पोला नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आता केवळ दोन दिवस बाकी असून संगमनेरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी या एक्स्पोचे काम निश्चितच कौतुकास्पद असून व्यवसायासोबत विकासाला चालना देणार्‍या या एक्स्पोचा सध्या संगमनेरकर मनमुराद आनंद लुटत आहे. लायन्स सफायरचे प्रकल्प गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, रोहित मणियार, अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी व त्यांच्या चमूने मोठ्या मेहनतीने संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. यावर्षीही सफायर बिझनेस एक्स्पो 26 जानेवारीपर्यंत संगमनेरकरांसाठी खुला राहणार आहे. लायन्स क्लबच्यावतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सफायरने व्यापार वृध्दी, व्यवसायाप्रती कटिबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे हा बिझनेस एक्स्पो सुरु आहे. या एक्स्पोमध्ये नामांकित उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत. कोरोना काळामध्ये बिझनेस एक्स्पोसह यात्रा-जत्रा बंद असल्याने पाळणे, बे्रकडान्स, वॉटर बोट, रेल्वे या खेळण्यांना लहान मुले मुकली होती. एक्स्पोच्या निमित्ताने संगमनेरकरांना ही मोठ संधी मिळाली. मोठ्या प्रमाणावर महिला मुले या एक्सपोचा आनंद लुटत आहेत. तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या चमूने केले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 117388

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *