टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येणार्‍या दुधवाहक टेम्पोने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रहिमपूर शिवारातील डोंगरेवस्ती येथे आज (सोमवार ता.9) सकाळी घडली आहे.

याबाबत आश्वी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील दुधाचा टेम्पो (क्र.एमएच.17, टी.5283) हा आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येत होता. त्याचवेळी संगमनेरकडून आश्वीच्या दिशेने अक्षय सोमनाथ गोसावी (वय 23) हा तरुण दुचाकीवरुन जात होता. यावेळी समोरुन येणार्‍या टेम्पोने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार अक्षय गोसावी याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 

Visits: 155 Today: 1 Total: 2056173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *