गळनिंब येथील शाळेत चोरी; इतर साहित्याचेही केले नुकसान

गळनिंब येथील शाळेत चोरी; इतर साहित्याचेही केले नुकसान
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गळनिंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता.6)रात्री दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. रेकॉर्ड रुममध्ये उचकापाचक करुन तोडाफोड केली. दरम्यान, चोरट्यांनी संगणकाची वायरिंग तोडली. त्यामुळे शाळेतील इलेक्ट्रॉनिक साहित्याचेही मोठे नुकसान झाल्याचे शालेय व्यवस्थापन समितीने सांगितले. शालेय परिसरात असा चोरीचा प्रकार सलग तिसर्‍यांदा घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे खोडसाळपणा की, चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरटे शाळेत गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शाळेत तीनवेळा चोरीचा प्रकार घडल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. सदर चोरीचा प्रकार मुख्याध्यापिकांना सकाळी शाळेत गेल्यावर लक्षात आल्याचे समजते. त्यांनी तातडीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांना माहिती देऊन याप्रकरणी कोल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

Visits: 242 Today: 1 Total: 2056216

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *