उक्कडगाव येथे नवरात्रौत्सवात भाविकांना येण्यास मनाई

उक्कडगाव येथे नवरात्रौत्सवात भाविकांना येण्यास मनाई
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना महामारीचा धोका अजूनही कायम असल्याने कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र उक्कडगाव येथील रेणुका देवी मंदिरात यंदा नवरात्रौत्सव सार्वजनिकरित्या साजरा होणार नाही. त्यामुळे भाविकांनी मंदीर कार्यस्थळावर घटी बसविण्यास येऊ नये असे आवाहन मंदीर देवस्थान व ग्रामस्थांनी केले आहे.


कोरोना साथीचा विळखा संपूर्ण जगावर असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने अद्यापही मंदीर अथवा तीर्थस्थाने दर्शनासाठी खुली केलेली नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जवळ येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांनी श्री क्षेत्र उक्कडगाव येथील रेणुका देवी मंदिरात घटी बसविण्यास येऊ नये. तसेच प्रसाद, खेळ साहित्य, खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी येऊ नये. घरीच यंदाचा नवरात्रौत्सव साजरा करावा, असे आवाहन देवस्थान व ग्रामस्थांनी केले आहे. तर खबरदारी म्हणून प्रशासनाने मंदीर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *