कोपरगाव तहसीलमधून रेशन तांदळाचा ट्रक चालकासह गायब

कोपरगाव तहसीलमधून रेशन तांदळाचा ट्रक चालकासह गायब
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ माल वाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदिंनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन-तीन दिवसांनंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाले.


25 ऑगस्ट, 2020 रोजी एमएच.17, बीवाय.6001 या क्रमांकाचा तांदळाने भरलेला ट्रक पकडून दिला होता. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ माल वाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदिंनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 2123329

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *