‘विश्वकर्मा’ पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शहरातील विश्वकर्मा समाज मंदिर येथे ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे उत्साहात पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेश वाकचौरे होते. तसेच जिल्हा बँकेचे नूतन संचालक गणपत सांगळे, उपकोषागार अधिकारी रुपेश भालेराव, तालुका फेडरेशनचे उपाध्यक्ष एकनाथ रहाणे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडेकर, संचालक भिमाजी राऊत, देविदास गोरे, महेश सूर्यवंशी, गोरक्ष राऊत, कचेश्वर सोनवणे, सुनील खरे, भाऊसाहेब साळवे, मंदाकिनी खरे, सविता वाकचौरे, अशोक वाकचौरे, मानद सचिव नामदेव गाडेकर, ज्येष्ठ सभासद अंबरनाथ गाडेकर, बबन खरे, भास्कर कदम, महेश जानवेकर, विलास सूर्यवंशी, कैलास भालेराव, कैलास क्षीरसागर आदी उपस्थित होते. महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पांडुरंग भागवत यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी मानले अशी माहिती व्यवस्थापक अरुण उदमले यांनी दिली.

Visits: 151 Today: 2 Total: 2054132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *