बसमध्ये बसलेल्या महिलेचे साडेआठ लाखांचे दागिने लंपास

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर 
शहरातील माळीवाडा बसस्थानक ते तारकपूर बसस्थानक या दरम्यान १५ मिनिटाच्या एसटी बसच्या प्रवासात महिलेच्या बॅगमधून ८ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. ही घटना रविवारी रविवारी सकाळी ११.५ ते ११.२० वाजण्याच्या कालावधीत घडली. बसमध्ये शेजारी सहप्रवासी म्हणून बसलेल्या महिलेने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्या संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुहासिनी पंडित आडोळे (वय ४८, रा. पोलीस कॉलनी, नंदनवन नगर, बोल्हेगाव) यांनी सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या पती समवेत रविवार दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर येथून नगरकडे एसटी बसने येत होत्या. त्यांना तारकपूर बसस्थानक येथे उतरायचे असल्याने त्यांची बस प्रथम जुन्या बसस्थानकात आली. तेथून तारकपूर बसस्थानकात गेल्यावर तेथे उतरून त्या बोल्हेगाव येथे घरी गेल्या. त्यांनी त्यांची बॅग पाहिली असता त्यामध्ये ठेवलेले सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्यांना दिसून आले नाहीत.
दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीत त्यांनी त्यांच्या शेजारी सहप्रवासी म्हणून बसलेल्या आणि तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या एका तरुणीवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित अनोळखी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Visits: 167 Today: 1 Total: 1918626

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *