भारतीय संस्कृती सारखी संस्कृती जगात नाही : रचना मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
संगमनेर मध्ये पुरोहित संघ अनेक वर्षांपासून महिलांना शक्ती देण्याचे कार्य करीत आहे. धार्मिक कार्यात तर संघ अग्रेसर आहेच मात्र आरोग्य, शिक्षण, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता अभियान असे सर्वांगीण  कार्य करून संघाने आदर्श निर्माण केला आहे. भारतीय संस्कृती सारखी संस्कृती जगात नाही  असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाच्या संचालिका रचना मालपाणी  यांनी केले. 
शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून प्रतीवर्षीप्रमाणे संगमनेर पुरोहित संघाच्या वतीने सामुहिक कुंकुमार्चन सोहळ्याचे  मालपाणी लॉन्सच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला महिलांची प्रचंड उपस्थिती होती. महाराष्ट्रात पुरोहित संघाच्या वतीने इतक्या भव्य प्रमाणात आयोजित केला जाणारा हा एकमेव कुंकुमार्चन सोहळा आहे.  यावेळी व्यासपीठावर  उद्धव महाराज कुर्कुमकर, नीलम खताळ,  कांचन थोरात, श्री व सौ. कपिल टाक आदींसह पुरोहित संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
मालपाणी पुढे म्हणाल्या, महिलांनी स्वावलंबी आणि धाडसी व निर्भय व्हावे, यासाठी आदीशक्तीची उपासना करण्याची हजारो वर्षांची परंपरा असल्याने त्या परंपरेचे पालन करून स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व महिलांनी संरक्षण कला आत्मसात करावी असे त्या म्हणाल्या.  संगमनेरचा उपक्रमशील पुरोहित संघ म्हणजे समाजासाठी झटणारी एक आदर्श संस्था असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. कांचन थोरात यांनी  या निमित्ताने प्रसन्न नारीशक्तीचे दर्शन घडल्याने आनंद आणि समाधान मिळाल्याचे सांगितले.  नीलम खताळ यांनी छोटेखानी परंतु अत्यंत प्रभावी भाषण करून महिलांची मने जिंकून घेतली.  तांबे यांचेही  भाषण झाले.
जाखडी यांनी आपल्या  भाषणात पुरोहित संघाच्या कार्याला सर्व समाजातून मिळत असलेल्या वाढत्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या पुरेपूर हितासाठी जो दक्ष असतो तो पुरोहित ही व्याख्या आम्ही आमच्या कार्यातून सत्यात उतरविण्यासाठी कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.  प्रास्ताविक उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार मुरारी देशपांडे यांनी मानले. यावेळी स्वप्नाली तापडे, स्नेहल मणियार, कीर्ती करावा,  कल्याणी कुलकर्णी, महेश मयूर, ॲड. नितीन जोर्वेकर, शाम महाराज,  सीमा मणियार, मेघना सुजीतराव नाईक,शाम महाराज केटरर्स,  धनंजय धुमाळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Visits: 172 Today: 1 Total: 1918715

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *