सुनिता ढाकणे सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

नायक वृत्तसेवा, शेवगाव 
तालुक्यातील राक्षी येथील केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित कै. सौ. सुनीता एकनाथ ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विषयांना मंजुरी देत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
चेअरमन श्रीकांत ढाकणे, व्हा. चेअरमन महेश  मरकड, सेक्रेटरी संतोष नन्नवरे, ऋषिकेश ढाकणे, डॉ,अंबादास डोंगरे, आर. एच. अत्तर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक  आणि सभासद यावेळी उपस्थित होते. प्रसंगी ४८ गुणवंत पाल्यांचा आणि सभासदांचा संस्थेच्या वतीने भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.चेअरमन श्रीकांत ढाकणे यांनी संस्थेचा नफा, तोटा पत्रक,  ताळेबंद वाचून दाखवला. पतसंस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढील वर्षापासून पाच लाख रुपये प्रति सभासद कर्ज मर्यादा करण्यात आली. अपघाती विमा संरक्षण तसेच गुणवंत पाल्यांचा सन्मान स्पर्धात्मक परीक्षेत प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासिका असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय याप्रसंगी घेण्यात आले व  नवीन ३१ सभासदांना मंजुरी देण्यात आली.सूत्रसंचालन श्रीमती येवले यांनी तर आभार  ऋषिकेश ढाकणे  यांनी मानले. यावेळी संतोष नन्नवरे, सुनील औताडे, महेश मरकड यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला. 
Visits: 102 Today: 1 Total: 2125067

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *