अकोलेत ग्राम शक्तीला नवे बळ!  डॉर्फ केटल मॅगो कप अंतर्गत आंबा लागवड

नायक वृत्तसेवा, अकोले 
सामाजिक दायित्व निधी अंतर्गत डॉर्फ केटल केमिकल्स लि. यांनी सप्रेम संस्था, नवदृष्टी संस्था आणि पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील चास, रुभोडी, सुगाव, लिहीत बु., काताळापुर आणि पांगरी या गावांमध्ये डॉर्फ केटल मॅगो कप ३.० अंतर्गत आंबा लागवडीचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे ग्राम शक्तीला नवे बळ मिळाले आहे.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामपंचायतींना उत्पन्नवाढीचे साधन उपलब्ध करून देणे, स्थानिक रोजगारनिर्मिती घडवून आणणे आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करणे हा आहे. ग्रामपंचायत सक्षम झाली, तर गावाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळवून देण्याचे हे प्रभावी पाऊल ठरत आहे. यावेळी गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन केशर आंबा लागवड केली.ग्रामस्थांच्या मते, हा उपक्रम हा केवळ वृक्षलागवडीचा कार्यक्रम नाही, तर गावाच्या भविष्याचा पाया घालणारी लोकचळवळ आहे.सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून गावविकास, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम साधला जात आहे.सीएसआर उपक्रम कसा गावांना सशक्त, स्वावलंबी व पर्यावरणपूरक विकासाकडे घेऊन जाऊ शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
वृक्षसंवर्धनासाठी पंचायत समितीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) आधार घेण्यात आला असून त्यामुळे स्थानिकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करून भावी पिढीमध्ये निसर्गप्रेमाची बीजे पेरली जात आहेत.
Visits: 312 Today: 1 Total: 1916677

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *