काँग्रेसचे सरचिटणीस मापारी यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

काँग्रेसचे सरचिटणीस मापारी यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला
हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची संगमनेर व राहाता काँग्रेसची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील पंधरा-वीस कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मापारी गंभीर जखमी झाले असून, या गुंड प्रवृत्तीचा निषेध करत हल्लेखोरांना तातडीने अटक करा अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस व राहाता तालुका काँग्रेस समितीच्यावतीने तालुका पोलिसांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला हल्लेखोरांना अटकेच्या मागणीचे निवेदन दोन्ही काँग्रेसच्यावतीने देण्यात आले. यावेळी अरुण कडू, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात, नवनाथ महाराज आंधळे, सुभाष निर्मळ, रमेश गागरे, भास्कर फणसे, बापू दिघे, सुमीत चौगुले, सचिन गाडेकर, नारायण घोरपडे, तानाजी मापारी, असीफ इनामदार, मुन्ना फिटर, राहुल दिघे, सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, भाऊसाहेब शिंदे, अण्णासाहेब थोरात, बाबासाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, तात्या कुटे, कचरु पवार यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मापारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याचा काँग्रेसने निषेध करुन हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

 

Visits: 167 Today: 1 Total: 1854500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *