आता संगमनेरचा विकास थांबणार नाही : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, धांदळफळ
केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार त्यामुळे आता संगमनेरचा विकास थांबणार नाही, त्यामुळे सर्वांनी विकासाबरोबर राहणे गरजेचे असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील संगमनेर ते अकोले राज्यमार्ग मीनाक्षी बांगला ते रामेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, संजय मोरे, हरीष वलवे, कैलास शिंदे, गोकुळ देशमुख, डॉ. महेंद्र कोल्हे, कमलेश डेरे, सुभाष कवडे, बाबासाहेब कवडे, अजित देशमुख,निलेश देशमुख,किशोर देशमुख,मिलिंद कोकणे, भारत नाईकवाडी,समीर आहेर, संतोष हांडे,भाऊसाहेब हासे, बाळासाहेब हासे, सुरेश लांडगे, महेंद्र कोकणे,अनिल अभंग, अविनाश वलवे, राजेंद्र देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ.खताळ पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचे काम झाले नाही म्हणून तुम्ही हा रस्ता तयार करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली होती. त्या नुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अन् कामाचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे अशा सूचना संबंधित ठेकेदाराला आपण दिलेल्या आहेत.पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Visits: 107 Today: 1 Total: 1098579
