रोटरी क्लब ऑफ संगमनेरचा गौरव! ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’सह तब्बल ७ ट्रॉफींची कमाई

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
जालना येथे पार पडलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२च्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ संगमनेरने ऐतिहासिक यश संपादन केले. क्लबने तब्बल सात ट्रॉफी जिंकत डिस्ट्रीक्टमध्ये आपला ठसा उमटवला. क्लबचे अध्यक्ष  साईनाथ साबळे यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे,  जयेश पटेल,  क्षितिज झावरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर रोटेरियन उपस्थित होते.
डिस्ट्रीक्टमधील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरने बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन पुरस्कार, एजीटीएस अँड डायरेक्टर ट्रेनिंग अवॉर्ड, बेस्ट फोरम मॅनेजमेंट ट्रॉफी, बेस्ट इकॉनॉमिक मॅनेजमेंट अवॉर्ड आणि बेस्ट पार्टिसिपेशन इन न्यू जनरेशन अवॉर्ड असे विविध मानाचे सन्मान पटकावले. या वर्षात इतके बहुमान मिळवणे हे केवळ क्लबच्या मेहनतीचे फळ नसून, सेवाभाव, नियोजनशक्ती आणि टीमवर्कचा मिलाफ आहे.
साईनाथ साबळे म्हणाले, हा सन्मान फक्त माझा नाही, तर संपूर्ण रोटरी क्लब ऑफ संगमनेरचा आहे. डायरेक्टर्स, माजी अध्यक्ष, सदस्य, आणि प्रत्येक रोटेरियनच्या निष्ठा व सेवाभावामुळेच हे यश शक्य झाले. या यशामागे क्लबचे नूतन अध्यक्ष विश्वनाथ मालानी, खजिनदार विकास लावरे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे यांच्यासह अनेक सभासदांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच  नरेंद्र चांडक, दीपक मणियार, रवींद्र पवार, अजित काकडे, सुनील कडलग, भारतभूषण नावंदर, ओंकार सोमाणी, सीए संजय राठी, प्रमोद मणियार, योगेश गाडे, आनंद हासे. सुनील घुले, पवनकुमार वर्मा, राजेंद्र खोसे, डॉ. किशोर पोखरकर, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. प्रमोद राजुस्कर, ऋषिकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय लाहोटी, बद्रीनारायण इंदानी, संकेत काजळे, अनिल सातपुते, दिलीप मालपाणी, रमेश पावसे, अमित पवार, मधुसूदन करवा, समीर शहा,. डॉ. संकेत मेहता, संतोष आहेर, अतुल वखारिया, मयूर मेहता यांसह संपूर्ण टीमने मेहनत घेतली.
Visits: 212 Today: 1 Total: 2060887

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *