श्रीरामपूरमध्ये एकाचवेळी दोन महिलांचे गंठण लांबविले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील काळाराम मंदिर परिसरात एकाचवेळी दोन महिलांचे गंठण चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (ता.22) रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची चोरीची नोंद श्रीरामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

श्रीरामपूर शहरात सध्या गंठण चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यावर पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे गंठण चोरांचे धाडस वाढले आहे. बुधवारी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास बढणे वस्ती जवळच राहत असलेल्या एका डॉक्टरच्या पत्नीचे गंठण दुचाकीवरुन येणार्‍या दोघांनी धूमस्टाईलने लांबविले. हिसका बसल्याने त्या खाली पडल्या. त्या आरडाओरड करत असतानाच हे दोघे चोरटे सूसाट वेगाने पसार झाले. त्यानंतर काही वेळातच तेथून काही अंतरावरच आणखी एका महिलेचे गंठण दुचाकीवरून येणार्‍या दोघांनी ओरबडून नेले. यामुळे या परिसरातून जाणार्‍या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस वेळेवर आले नाही. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याने दुसरी घटना पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे घडली. पोलिसांच्या एकाच भागात काही मिनिटांच्या अंतराने दुसरी घटना घडल्याने पोलिसांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Visits: 153 Today: 1 Total: 1868082

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *