संचालक मंडळाच्या विश्वासावर ठेवींचा वाढता ओघ : नवले

नायक वृत्तसेवा, अकोले 
बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या  ठेवी मध्ये सातत्याने वाढ होत असून आता संस्थेच्या ठेवी २८५ कोटींवर गेल्या आहेत. तर सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात या ठेवी गत वर्षीच्या ठेवी पेक्षा १५ कोटी ९३ लाख रुपयांनी वाढल्या असून ठेवींचा वाढता ओघ हा संचालक मंडळावर असलेल्या विश्वासनेच हे शक्य झाल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन मधुकर नवले यांनी सांगितले.
 येथील बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे  संस्थापक चेअरमन मधुकर नवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी नवले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊपाटील नवले, दूध संघाचे माजी अध्यक्ष कचरु  शेटे, संस्थेचे व्हा .चेअरमन रमेश जगताप,  नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, बुवासाहेब मल्टी स्टेटचे चेअरमन विक्रम नवले, व्हा .चेअरमन नवनाथ वाळुंज, सोसायटीचे माजी अध्यक्ष मारुती नाईकवाडी, माजी प्राचार्य बाबासाहेब देशमुख, रामनाथ चौधरी, सोसायटीचे व्हा. चेअरमन उत्तम धुमाळ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे उपस्थित होते.
भाऊपाटील नवले म्हणाले की, पतसंस्थेचे आरोग्य चांगले असेल तर ही पतसंस्था चळवळ पुढे जाईल.आज पर्यंत मी २०० संस्थाना भेटी दिल्या. ज्या संस्थेत आपण गुंतवणूक करतो त्याचा अभ्यास करूनच  गुंतवणूक करा असेही नवले म्हणाले.सरव्यवस्थापक लखन माता शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.तर गत वर्षीच्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वचन  हरनामे यांनी केले. सभेच्या प्रारंभी संचालक प्रतिभा घुले यांनी स्वागत केले. श्रद्धांजलीचा ठराव व्हा. चेअरमन रमेश जगताप यांनी मांडला.यावेळी संस्थेचे संचालक ॲड. आनंद नवले, प्रतिभा घुले, मंदा नवले, भास्कर दराडे, रामदास धुमाळ, विठ्ठल धुमाळ, प्रकाश देशमुख, सुजित नवले, दिलीप मंडलिक, शिवाजी चौधरी, भागवत शेटे, अनिल गायकवाड, रामदास शेटे, मुरलीधर शेणकर, गवराम ताजणे, सूर्यभान नाईकवाडी, साईनाथ नवले, विक्रम मंडलिक, संगीता चौधरी, तज्ञ संचालक भाऊसाहेब झोलेकर, शांताराम काकड, शरद पानसरे यांच्या सह रजनीकांत भांगरे, यादव नाईकवाडी, बबन देशमुख प्रा.बाळासाहेब शेटे आदी उपस्थित होते.
Visits: 135 Today: 1 Total: 1425643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *